देशभक्त बाबासाहेब खंजिरे स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत रंगतदार लढती



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :  प्रतिनिधी : 

येथील जयहिंद मंडळाच्या क्रीडांगणावर देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी निमित्ताने सुरू असलेल्या 70 किलो वजनी गटाखालील कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रंगतदार लढती पहायला मिळाल्या साखळी फेरीतील सामन्यात सामना जय हनुमान बाचणी विरुद्ध महालक्ष्मी कुपवाड यांच्यात खेळविण्यात आला या मध्ये जय हनुमान बाचणी संघाने पहिल्या डावात वर्चस्व राखत 15 विरुद्ध 4 अशी 9 गुणांची आघाडी घेतली तर उत्तरार्धात ही आघाडी वाढवीत 29विरुद्ध 10 अशा 19 गुणांनी विजय मिळविला. साई कोरोची विरुद्ध बालभारत इचलकरंजी या सामन्यात पूर्वार्धात कोरोची संघाने 16 विरुद्ध 8 अशा 8 गुणांच्या फरकाने आघाडी घेतली. उत्तरार्धात मात्र बालभारत संघाने आपला खेळ उंचावत कोरोची संघास निकराने झुंज दिली मात्र साई कोरोची संघाने 23 विरुद्ध 22 अशा 1 गुणाच्या फरकाने निसटता विजय मिळावीत आपल्या खात्यावर गुण जमा केले.साखळी फेरीतील मावळा सडोली विरुद्ध सह्याद्री कोल्हापूर या लढतीत मावळा संघाने आपल्या प्रतिस्पर्धी सह्याद्री संघावर 15 गुणांनी मात करीत एकतर्फी विजय मिळवला तर जयमातृभूमी सांगली संघाने आपल्या प्रतिस्पर्धी सनी नागाव संघावर 23 गुणांनी विजय मिळावीत गुणांची कमाई केली.

दरम्यान कै. हिंदुराव कौंदाडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणार पहिल्या दिवशीचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देवराज स्पोर्ट्स यड्राव चा खेळाडू रोहित राजू पाटील याला उदयसिंह पाटील, राहुलजी खंजिरे, प्रशांत माळी, संजय हुच्चे, डी. एन. कौंदाडे, महादेव कांबळे, आनंदा कौंदाडे आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच साखळी फेरीतील सामन्यात जय हनुमान, बाचणी, जय मातृभूमी, सांगली, मावळा स्पोर्ट्स, सडोली, जयहिंद मंडळ, इचलकरंजी, जय शिवराय, हेरले, शिवमुद्रा स्पोर्ट्स, कौलव यांनी आपल्या गटातील प्रतिस्पर्धी संघावर मात करीत गटातून अव्वल स्थान प्राप्त करीत बाद फेरीत प्रवेश केला. गटातील अव्वल संघाबरोबरच गटातील उपविजेते देखील बाद फेरीत दाखल झाले. 

       बाद फेरीतील खेळविण्यात आलेल्या राष्ट्रसेवा कुरुंदवाड  आणि जय शिवराय हेरले या दरम्यानच्या सामन्यात राष्ट्रसेवा कुरुंदवाड या संघाने 08 गुणांनी सहज विजय मिळवीत पुढील फेरीत प्रवेश केला. तर बालशिवाजी शिरोळ आणि देवराज यड्राव यांच्यात झालेल्या सामन्यात पहिल्या डावात दोन्ही संघानी 11 गुण मिळावीत चुरस निर्माण केली. पण उत्तरार्धात मात्र बालशिवाजी संघाच्या खेळाडूंनी सरस खेळाचे प्रदर्शन करीत देवराज संघावर तब्बल 13 गुणांनी मात केली. अन्य सामन्यात शिवमुद्रा कौलव संघाने राष्ट्रसेवा तळसंदे संघावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत सामना 33 विरुद्ध 14 अशा 19 गुणांनी सहज खिशात घातला. बाद फेरीतील छावा शिरोली विरुद्ध साई स्पोर्ट्स कोरोची यांच्यात झालेल्या सामन्यात अनुभवी छावा संघाला चांगला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण छावा शिरोली संघाने आपल्या अनुभवाच्या बळावर हा सामना 33 विरुद्ध 13 अशा 20 गुणांच्या फरकाने जिंकला.

        दरम्यान स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीचा सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी देण्यात येणारा कै. जहाँगिर खलिफा स्मृती चषक जय शिवराय हेरले संघाचा चढाईपट्टू दर्शन थोरवत याला  देण्यात आला. यावेळी राहुल खंजिरे, राष्ट्रीय खेळाडू मुस्तफा खलिफा, महादेव कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट दिली. त्यांनी देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आज उशिरापर्यंत सामने खेळविले जाणार असून विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेला क्रीडारसिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून स्पर्धा संयोजन समितीने उत्कृष्ट नियोजन केल्याचे समाधान व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post