उदगांव येथील प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी १४६ कोटीच्या निधीला मंत्रिमंडळाची मंजुरी

लवकरच मनोरुग्णालय इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात

राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती



प्रेस मीडिया लाईव्ह :

जयसिंगपूर-शिरोळ तालुक्यातील उदगांव येथे प्रादेशिक मनोरुग्णालय उभे राहावे यासाठी यापूर्वी 118 कोटीच्या प्रस्ताव सादर केला होता, त्याला यापूर्वी मान्यता मिळाली होती, बुधवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये 118 कोटी ऐवजी 146 कोटी रुपयांचा निधी उदगांव येथील प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, या रुग्णालयासाठीचा प्रस्ताव आपण  शासनाकडे सादर केला होता,११ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोग्य मंत्री नामदार तानाजी सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीमध्ये आरोग्य मंत्री

नामदार तानाजी सावंत यांनी उदगांव येथे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास बैठकीत तत्त्वता मान्यता दिली होती, २०२२-२३ सादर झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या रुग्णालयासाठी ११८ कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली होती,  सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या रुग्णालय इमारतीच्या आराखड्यास मान्यता ही मिळाली आह

Post a Comment

Previous Post Next Post