डॉ.सौ.मनिषा भोजकर कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी

रेंदाळ येथील कविवर्य एकनाथ रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने अभ्यासू व्याख्यात्या डॉ.सौ.मनिषा अभिजीत भोजकर यांना कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

रेंदाळ येथील डॉ.सौ.मनिषा अभिजीत भोजकर या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्याचबरोबर व्याख्यान,लेखन या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या कार्यात देखील सक्रिय आहेत.महिला सबलीकरणाबरोबरच तरुणाईमध्ये सामाजिक भान आणण्यासाठी त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो.त्यांच्या या  उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच 

कविवर्य एकनाथ रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने त्यांची कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.नुकताच त्यांना या पुरस्काराचे वितरण गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ.सौ.मनिषा भोजकर यांचे मानसिक आरोग्य या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले.या कार्यक्रमास रेंदाळच्या लोकनियुक्त सरपंच सौ.सुप्रिया पाटील , उपसरपंच अभिषेक पाटील ,माजी सरपंच शिवाजी पाटील यांच्यासह विविध मान्यवर ,वाचनालयाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post