मैत्रेयी खोत यांची सहाय्यक नगररचनाकार पदावर निवड

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी: प्रतिनिधी : 

येथील मैत्रेयी संजय खोत यांची सहाय्यक नगररचनाकार श्रेणी 1 गट ब या पदावर निवड झाली आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच झालेल्या परीक्षेत मैत्रेयी यांची निवड झाली आहे. त्यांना आचार्य श्री 108 चंद्रप्रभ सागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विद्या सन्मतीदास सेवा संस्थेच्या वीराचार्य ॲडव्होकेट  बाबासाहेब कुचनूरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन निवासी केंद्र धर्मनगर चे मार्गदर्शन लाभले.




मैत्रेयी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इचलकरंजी येथे झाले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण सीओईपी पुणे या ठिकाणी पूर्ण केले. त्यानंतर ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग मध्ये एम. प्लान एस पी ए नवी दिल्ली येथे पूर्ण केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यातील नगररचनाकार पदासाठी नुकतीच स्पर्धा परीक्षा झाली. त्यामध्ये मैत्रेयी यांनी यश मिळवले. त्यांना पुणे येथे असलेल्या विद्यासागर अकॅडमीचे ओंकार शेंडुरे यांचे तसेच वडील शरद इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट चे प्राचार्य  डॉ. संजय खोत व आई प्रा.डॉ.उर्मिला खोत यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post