द केरला स्टोरी चित्रपट राज्य सरकारने करमुक्त करावा : भाजपची मागणी

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी 

देशातील लव जिहादची ज्वलंत समस्या मांडणारा द केरला स्टोरी हा चित्रपट राज्य सरकारने करमुक्त करावा ,अशी मागणी भाजपच्या वतीने आज राज्य सरकारकडे करण्यात आली.या मागणीचे निवेदन येथील प्रांताधिकारी मोसमी बर्डे - चौगुले यांच्याकडे सादर करण्यात आले.तसेच सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही इ मेल व्दारे पाठवण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की,द केरला स्टोरी या चित्रपटाच्या माध्यमातून लव जिहादची ज्वलंत समस्या मांडण्यात आली आहे.त्यामुळे हा चित्रपट सध्या मोठा चर्चेत आहे.या चिञपटातून हिंदू महिला - युवतींचे प्रबोधन होण्याची गरज लक्षात घेऊन उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश सरकारने हा चित्रपट करमुक्त केला आहे.याच पध्दतीने महाराष्ट्र राज्य सरकारने देखील हा चित्रपट करमुक्त करावा,अशी मागणी इचलकरंजी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन आज मंगळवारी शिष्टमंडळाने येथील प्रांत कार्यालयात मोसमी बर्डे - चौगुले यांच्याकडे सादर केले.तसेच या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे ई मेलव्दारे पाठवण्यात आली आहे.

या शिष्टमंडळात भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेश संयोजक विनोद कांकाणी , बाळकृष्ण तोतला ,दीपक पाटील , राजेंद्र पाटील,हरिष थानवी , अतुल पळसुले, उमाकांत दाभोळे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post