हॉस्पिटलची सुरक्षा करणारे सुरक्षा रक्षकच असुरक्षित ,


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

पनवेल नवी मुंबई मध्ये अनेक छोट्या मोठ्या हॉस्पिटल ,दवाखाने यांनी रुग्णांच्या  उपचारादरम्यान काही अघटित  घडल्यास  रुग्णांच्या नातेवाईकांचा त्रास होऊ नये म्हणून खाजगी सुरक्षा रक्षक बाउन्सर नेमले आहेत. शहरातील हॉस्पिटल यांनी नवाब शेख याच्या एजंसी  कडूनच सुरक्षा रक्षक बाउन्सर नेमायचे असे अलिखित आदेश रोटरी क्लब चे डॉ अनिल परमार यांनी दिले आहेत.मात्र जे  बाउन्सर सुरक्षा रक्षक जी  एजन्सी पुरवते ते सुरक्षा रक्षकच असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे .काही दिवसापूर्वी या एजन्सी मधील सुरक्षा रक्षकांचा अपघाती मृत्यू झाला असून सुरक्षा रक्षक एजन्सी चे मालक नवाब शेख यांनी या कामगाराचा ,सुरक्षा रक्षकांचा कुठला हि विमा काढला नाही अथवा कामगारांचे शासन नियमाप्रमाणे पी. एफ., इ, एस ,आय पॉलिसी काढल्या नसल्याचे समोर आले आहे . नवाब शेख याला डॉ. अनिल परमार यांचा  वरदहस्त असल्याने तो त्याच्याकडे असलेल्या कामगारावर असा अन्याय करून त्यांनाच असुरक्षित ठेवत आहे .

 पनवेल तालुक्यात अनेक वेळा हॉस्पिटल मध्ये रुग्ण डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे दगावतात ,अथवा अवाच्या सव्वा उपचाराची  बिल्ले ,हॉस्पिटल प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे रुग्णाचे नातेवाईक आणि हॉस्पिटल यामध्ये वाद होत असतात अनेक वेळा काही डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल चे नुकसान करून डॉक्टरांवर हि हल्ले केले आहेत ,डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र   गुन्हा दाखल करता येतो मात्र बहुतांश वेळा हॉस्पिटल ची चूक असल्याने डॉक्टर अथवा हॉस्पिटल गुन्हा दाखल करण्यास पुढे जात नाहीत आणि म्हणूनच आपला आणि हॉस्पिटल चा बचाव करण्यासाठी खाजगी  बाउन्सर सुरक्षा रक्षक नेमले जातात . पनवेल ,खारघर .कामोठे ,कळंबोली ,खांदा कॉलनी ,नवीन पनवेल या भागात शेकडो   हॉस्पिटल आणि दवाखाने ,लॅब आहेत  यातील ८० पेक्षा अधिक हॉस्पिटल ,दवाखाने ,लॅब यांनी मिळून डॉ अनिल परमार यांच्या अलिखित आदेशाप्रमाणे नवाब शेख यांचे बाउन्सर घेतेले आहेत या टीम मध्ये आजूबाजूच्या गावातील तरुण बॉडी बिल्डर मुले तर काही परप्रांतीय मुले नेमली असून हि चार  चार च्या टीम ने हि मुले दोन शिफ्ट मध्ये हॉस्पिटल ला फेऱ्या मारून काही घडले नाही ना यांची चौकशी करीत असतात एखाद्या हॉस्पिटल ला मॅटर झाल्यास  हि सगळी टीम त्या ठिकाणी जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांना दमात घेत दादागिरी करून गप्प करतात याचेच  या नवाब शेख च्या  एजन्सीला हॉस्पिटल प्रश्नासन महिन्याकाठी पाच हजार ते पंधरा हजार रुपये  मोजतात  . 

मात्र ज्या नवाब शेख याला हा ठेका दिला आहे त्याने त्याच्याकडे असणाऱ्या कामगारांचा शासन नियमाप्रमाणे कुठलाही विमा ,पी एफ .काढला नसून त्यांनी त्या कामगारांची नोंद हि कामगार कार्यालयात केली नाही .काही दिवसापूर्वी सिंग नावाचा  एक कामगार अपघातात मृत्यू  पावल्याने सदर बाब  समोर आली आहे  . मात्र त्यावर नवाब शेख  यांनी पडदा टाकला असून पनवेल मधील डॉ अनिल परमार हे नवाब याच्या पाठीशी असल्याने तो शासन नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे बोलले जात आहेत .यातील काही    डॉक्टरांनी नवाब शेख  आणि डॉ अनिल परमार   यांचे काहीतरी या कामात आर्थिक लागेबंध आहेत ,तसेच डॉ अनिल परमार हे  त्यांच्या क्लब चे पदाधिकारी आहेत  नवाब याची सेवा समाधानकारक  नसताना केवळ अनिल परमार यांचे सांगण्यावरून हि सेवा घ्यावी लागते असे काही डॉक्टरानी  आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post