अन्यायाला वाचा फोडणारा बुलंद आवाज युवा नेतृत्व नवनाथ आडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा

चांगल्या चांगल्यांना फुटतो घाम, बघूनिया नवनाथ आडे सर यांचे काम 

प्रेस मीडिया लाईव्ह :

गेवराई दि.१३ (प्रतिनिधी) :- पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्ट्राचार याविरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा, समोरचा बरोबर घायाळ होईल. आपल्या आयुष्यात हजारो व्यक्ती येतात आणि जातात पण काही बोटावर मोजणे इतके लोक आपल्या परिचयात राहतात याचं कारण असं की जर एखाद्या व्यक्तीकडे एखाद कौशल्य असेल आणि त्या कौशल्याच्या जोरावर तो त्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असेल तर नक्कीच जनता त्याला आपल्या आठवणीत ठेवते.


 अशा प्रकारचेच  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोमलवाडी येथील निर्भीड पत्रकार नवनाथ आडे(पत्रकार) यांचे व्यक्तिमत्व आहे. पत्रकारिता क्षेत्रात येऊन त्यांना फक्त तीन-चार वर्षे झालीत परंतु आपल्या कर्तुत्वाने व आपल्या निर्भीडपणाच्या जोरावर बीडवासियांच्या मनावर ते घर करून बसलेत. कारण आठवण त्याचेच काढली जाते ज्याने काहीतरी उल्लेखनीय कामगिरी केलेली असते. नवनाथ आडे सर यांचे व्यक्तिमत्व काहीस तसंच आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पण म्हणून त्यांना बीड जिल्ह्यामध्ये एक निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाते कितीही धमक्याला किंवा कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांची लेखणी कधी बंद पडली नाही. काही महिन्यापूर्वीच उदाहरण आहे. सराफा व्यापारी उदावंत यांच्या आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय होते याचा उलगडा नवनाथ आडे यांनी केला व यासाठी त्यांना काही धमकीचे फोन सुद्धा आले होते परंतु ते खंबीरपणे उदावंत परिवाराच्या मागे राहिलेत आणि न्याय मिळवून देण्याचा सतत त्यांनी प्रयत्न केला. शेतकरी, सर्वसामान्य माणूस यांचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते नेहमीच प्रशासनासमोर मांडतात. पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यात सुद्धा ते हिरीरीने सहभाग घेतात. आणि म्हणूनच समाजामध्ये त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. आपल्यावर विरोधकांनी कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांची लेखणी कधी ना झुकली ना कधी झुकणार अशाप्रकारे विरोधकांना घाम फोडणारी उल्लेखनीय कामगिरी आपल्या पत्रिकारितेच्या माध्यमातून ते सातत्याने करत असतात. आणि पत्रकार म्हटल्यानंतर  समाजात वावरत असताना चांगल्या वाईट गोष्टीचा अनुभव हा येतच असतो आणि चांगल्या गोष्टीचा कसा आनंद घ्यायचा आणि वाईट  गोष्टीचा भिकार कशाप्रकारे करायचा हे त्यांना चांगलंच माहिती आहे. आणि विशेष म्हणजे ते दिव्यांग आहेत परंतु त्याचे शारीरिक दिव्यांगत्व कधीही पत्रकारितेच्या आड आले नाही. त्यांच्याकडून एक गोष्ट महत्त्वाची शिकण्यासारखी आहे ते म्हणजे जरी सुद्धा एखादा शारीरिक अपंगत्व असेल तरीही चालेल, पण मनुष्य हा मनाने व विचारक्षमतेने अपंग नसला पाहिजे. आणि अशा या तरुण ,तडफदार, युवा पत्रकाराचा जन्मदिवस 15 मे रोजी आहे. व त्यानिमित्ताने माझ्याकडून पत्रकार नवनाथ आडे यांना वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा आणि पत्रकारिता क्षेत्रात असेच तुम्ही उलखनीय कामगिरी करत राहो व तुमच्या लेखणीच्या माध्यमातून अशाच प्रकारे समाजकार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!


   शब्दांकन

- स्वप्निल मनोहर गोरे

Post a Comment

Previous Post Next Post