कर्नाटकात अभूतपूर्व विजयानंतर काँग्रेसमध्ये खुशीची लहर



प्रेस मीडिया लाईव्ह :

कर्नाटकात अभूतपूर्व विजयानंतर काँग्रेसमध्ये खुशीची लहर आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व करिष्माई सिद्ध झाल्याचा काँग्रेसजनांमध्ये आनंद जरूर आहे.राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेचा करिष्मा मतदानाच्या टक्केवारीतून काँग्रेसला लाभ देऊन गेल्याचे काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आवर्जून नमूद केले आहे. 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतले आघाडीचे नेते सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना कर्नाटकात काँग्रेसचा विजय ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीतल्या विजयाची छोटी पायरी असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी त्यांनी काँग्रेस सह सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील आणि राहुल गांधी पंतप्रधान बनतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.पण विरोधकांच्या ज्या एकजुटीचा विश्वास सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे, त्याला छेद देणारी आकडेवारी कर्नाटकाच्या निवडणुकीत सिद्ध झाली आहे.

काँग्रेसला कर्नाटकात 42.93% मते मिळाली. भाजपला 36.17% मते मिळाली, तर जेडीएसला 12.97% मते मिळाली. जेडीएसला 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 17 % पेक्षा जास्त मते मिळाली होती. ती यावेळी साधारण 5 % च्या आसपास घसरली आहे आणि तिथेच काँग्रेसचा लाभ झाला आहे. काँग्रेसला भाजप पेक्षा साधारण 7 % टक्के मते जास्त मिळाली आहेत. पण भाजपचा 2018 चा व्होट शेअर अजिबात घटलेला नाही.भाजपला अपेक्षित असलेली मतांची टक्केवारी वाढली नाही, हा खऱ्या अर्थाने भाजपचा पराभव आहे. 

बेळगाव मध्ये कुणाचे किती आमदार?

काँग्रेस- 11

भाजप- 7

इतर - 0

एकूण- 18

1. कागवाडमधून काँग्रेसचे राजू कागे यांचा विजय, भाजपचे श्रीमंत पाटील यांचा पराभव.

2. यमकनमर्डीतून काँग्रेसचे सतीश जारकीहोळ यांचा विजय,भाजपचे बसवराज हुंदरी आणि महाराष्ट्र एकिकरण समितीचे मारुती नाईक यांचा पराभव.

3. बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विजय, भाजपचे नागेश मन्नोळकर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर एम चौगले यांचा पराभव.

4. निपाणीमधून भाजपच्या शशिकला जोल्ले यांचा विजय, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उत्तम पाटील पिछाडीवर, म.ए.समितीचे जयराम मिरजकर यांचा पराभव.

5. खानापूरमधून भाजपचे विठ्ठल हलगेकर विजयी, काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर आणि मुरलीधर पाटील यांचा पराभव.

6. बेळगाव दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील विजयी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर यांचा पराभव.

7. अथणीमधून (माजी उपमुख्यमंत्री) काँग्रेसचे लक्ष्मण सवदी यांचा विजय, भाजपचे महेश कुमठोळे यांचा पराभव.

8. गोकाक मतदार संघात भाजपचे रमेश जारकीहोळ यांचा विजय, काँग्रेसचे मानतेश कडाडी यांचा पराभव.

9. बेळगाव उत्तरमधून काँग्रेसचे राजू शेठ यांचा विजय, भाजपचे डॉ.रवी पाटील आणि म.ए.समितीचे अमर येळ्ळूरकर यांचा पराभव.

10. रायबागमधून भाजपचे दुर्योधन ऐहोळे यांचा विजय, काँग्रेसचे महावीर मोहिते यांचा पराभव.

11. आरभावी मतदारसंघातून भाजपचे भालचंद्र जारकीहोळ यांचा विजय, अपक्ष उमेदवार भिमप्पा गुंडप्पा गदद आणि काँग्रेसचे अरविंद दळवाई यांचा पराभव आघाडीवर.

12. कित्तूरमध्ये काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांचा विजय, भाजपचे महांतेश दोडगौडर यांचा पराभव.

13. सौंदत्ती मतदार संघत काँग्रेसचे विश्वास वैद्य यांचा विजय, भाजपचे रत्ना मामनी यांचा पराभव.

14. हुक्केरीमध्ये भाजपचे निखिल काती विजयी, काँग्रेसचे ए. बी. पाटील यांचा पराभव .

15. कुडचीमधून काँग्रेसचे महेंद्र तम्मणवर विजयी, भाजपचे पी राजीव यांचा पराभव.

16. चिक्कोडी- सदलगामधून काँग्रेसचे गणेश हुक्केरी यांचा विजय, भाजपचे रमेश कत्ती यांचा पराभव.

17. बैलहोंगलमधून काँग्रेसचे महांतेश कौजलगी विजयी, भाजपचे जगदीश मेटगुड यांचा पराभव.

18. रामदुर्गमधून काँग्रेसचे अशोक पट्टण यांचा विजय, भाजपचे चिक्करेवण्णा यांचा पराभव .

Post a Comment

Previous Post Next Post