इचलकरंजी दातारमळा परीसर प्रभाग क्र 28 29, येथे आनंदाचा शिधा वाटप

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  (प्रतिनिधी) :

मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य जयंतीनिमित्त राज्यभरातील नागरीकांच्या साठी राज्यातील शिधापत्रिक धारकांना फक्त १०० रुपयांत 'आनंदाचा शिधा' देण्याची घोषण शिंदे - फडणवीस महायुती सरकारने केली होती.

या योजनेचा लाभ आंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील शिधापत्रिका धारकांना मिळणार असून यामध्ये १०० रुपयांत शिधापत्रिका धारकांना १ किलो रवा, १ किलो हरभरा डाळ, किलो साखर, तसेच १ लिटर पामतेल, या ४ वस्तूंच्या किटचे वाटप इचलकरंजी   येथील मा खासदार  बाळासो माने ग्राहक  सेवा संस्थेच्या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये  भारतीय जनता पार्टी च्या शहर चिटणीस सौ योगिता दाभोळे व*  *संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या किटचे वाटप करुण शुभारंभ करण्यात आला. यावेळी भागातील जेष्ठ नागरिक बच्चाराम तोडकर , दिपक शिखरे युवराज तोडकर श्रीकांत सकंपाळ आरविंद पाटील पप्पु पाटील प्रकाश चौगुले  सावित्री जाधव मधुमती तोरगुले सौ मनिषा नाईक सौ स्वाती कोल्हापूरे तगव्वा झाडे सौ देवरमनी , दगडु मुडशिंगे उमाकांत दाभोळे यांच्यासह भागातील नागरिक व भाजपा कार्यकर्ते सह शिधापत्रिका लाभार्थी उपस्थित होते* 

Post a Comment

Previous Post Next Post