निवडणूक कारखान्याची ईर्षा बिंदु चौकात घालमेल नागरिकांची



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापुर -सध्या राजाराम साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे.दोन्ही कडुन आव्हान प्रतिआव्हानाने संघर्ष टोकाला गेला आहे.माजी आमदार अमल महाडीक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्षा बिंदु चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूकआली असता काही काळ तणाव निर्माण झाला होता.


पोलिसानी माजी आमदार महाडीक आणि आ.ऋतुराज पाटील यांना आमोर समोर येण्यापासून रोखल्यामुळे मोठा    अनर्थ टळला,यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.एका कार्यक्रमात आ.पाटील यांनी महाडीक यांच्यावर टीका केली होती त्याला प्रतिउत्तर देताना माजी आमदार अमल महाडीक मी बिंदु चौकात येतो,तुम्ही या असे आव्हान दिले होते.सोशल मिडीया याचा भडका उडाला होता.काहीच्या स्टेटस वर बिंदु चौकात या असे आवाहन केले होते.त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ़ करून शिघ्र कृति दलाची तुकडीसह अश्रुधुराची नळकांडी,दंगलकाबू साहीत्यासह पोलिस सज्ज होते.

 सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक येत होती त्या मध्ये लहान मुली महिला लेझीम खेळण्यात दंग होते तर मिरवणूक पहाण्यात आबाल वृध्द लोक ही मिरवणूक पाहण्यात दंग होते.मिरवणूक हळू हळू पुढे जात होती.एवढ़्यात पोलिसांची आमदार ,माजी आमदार बिंदु चौकात येत असल्याचे समजले वरुन पोलिसांची धावपळ सुरू झाली काय झालं म्हणून कुणाला काय कळेना,जर त्यावेळेस मिरवणूक थांबली असती तर त्या वेळेस किती गोंधळ उडाला असता याची कल्पना करता आली असती काय ?जर काय दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण अशी जनतेतून विचारणा होत आहे.हे जे घडलं त्या मुळे लोकांच्यात नाराजी पसरली आहे. म्हणून लोकांच्यात कुजबूज होती की निवडणूक कारखान्याची त्यांचा संघर्ष बिंदु चौकात घालमेल मात्र लोकांची

Post a Comment

Previous Post Next Post