एका मेंढपाळाचा गळा चिरून निघृणपणे केलेला खुनाचा गुन्हा उघड, 24 तासात आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कुरूंदवाड पोलीस ठाणे, कोल्हापूर यांची संयुक्तीक कामगिरी


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : श्री. सावकर कल्लाप्पा देभाजे, व.व.35, रा. आर. के. नगर, वडर वसाहत, मजरेवाडी, ती. शिरोळ, जि. कोल्हापूर हे दि. 17.04.2023 रोजी दुपारी 12.00 वा. चे सुमारास शेळ्यांना चारा घेवून येतो असे सांगुन त्यांचे घरातून मोटर सायकलवरुन गेले व सायंकाळ झाली तरी घरी परत आले नाहीत. म्हणून त्यांची पत्नी कस्तुरी सावकर देभाजे यांनी त्यांचे पती सावकर देभाजे याचा सर्वत्र शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत. दुसरे दिवशी दि. 18.04.2023 रोजी त्यांनी इतर नातेवाईकांना बोलावून घेवून पती सावकर देभाजे यांचा शोध घेत असताना मजरेवाडी ते कुरूंदवाड जाणारे रोडलगत असले बी.पी.एड कॉलेज जवळ सावकर देभाजे यांची मोटर सायकल मिळून आली. सदर परिसरात शोध घेत असताना बी.पी.एड कॉलेजचे पाठीमागील बाजूस झुडपात सावकर देभाजे हे मयत अवस्थेत मिळून आले असून कोणीतरी अज्ञात इसमाने सावकर देभाजे यांचा निघृणपणे गळा चिरून खुन केला असलेची खात्री झाली.

म्हणून त्यांची पत्नी कस्तुरी सावकर देभाजे यांनी त्यांचे पतीचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून खुन केले बाबत कुरूंदवाड पोलीस ठाणे येथे दि. 18.04.2023 रोजी गुन्हा दाखल केला आहे.

सदरचा कुरूंदवाड पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झालेनंतर गुन्ह्याचे घटनास्थळी श्री.निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक, गड विभाग, श्रीमती अन्नपुर्णा सिंग, परिविक्षाधीन सहा. पोलीस अधीक्षक श्री. रामेश्वर वैजणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर विभाग, श्री महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व श्री बालाजी भांगे, सहा. पोलीस निरीक्षक, कुरूंदवाड पोलीस ठाणे यांनी भेट दिली. घटनेबाबत श्री शैलेश बलकवडे साो, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांना माहिती दिली. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक सो यांनी सदर गुन्ह्याचे गांभिर्य ओळखुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कुरूंदवाड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना त्यांचेकडील तपास पथके तयार करून सदरचा निघृण खुनाचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणणेच्या दृष्टीने सुचना देवून योग्य ते मार्गदर्शन केले.

मा. वरीष्ठांनी दिले सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे घडलेली घटना, मयताचा पुर्व इतिहास तसेच तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता सदरचा गुन्हा हा मयताचे समाजातीलच माळाप्पा हेग्गण्णावार, रा. नागराळे, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक याने केला असून गुन्हा  घडले पासून तो फरार असलेची माहिती समोर आली. म्हणून तपास पथकांनी आरोपी माळाप्पा क-याप्पा हेग्गण्णावार, व.व.25, रा. हेग्गण्णावार कोडी, नागराळे, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक याचा शोध घेवून त्यासत्याचे चिक्कोडी, जि. बेळगाव, राज्य-कर्नाटक येथील नातेवाईकांचे घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.

सदर गुन्ह्यातील मयत सावकर देभाजे हा त्यांचे समाजातील असून तो आरोपी माळाप्पा हेग्गण्णावार याचे पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करीत होता. म्हणून आरोपी माळाप्पा हेग्गण्णावार याने मयत सावकर देभाजे यास सुमारे सात दिवसांपुर्वी भेटून त्याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहू नको असे समजावून सांगितले होते. त्यावेळी त्यांचेत वाद झाला होता. आरोपी माळाप्पा हेग्गण्णावार हा त्यांचे समाजातील लोकांना होणारा त्रास कमी व्हावा याकरीता त्यांचे अंगावरून लिंबू उतरविनेचा उपाय सांगत होता. मयत सावकर देभाजे यास होणारे कौटुंबिक त्रासा बद्दल उपचाराकरीता तो अधून मधून आरोपी माळाप्पा हेग्गण्णावार याचे घरी जात होता. मयत सावकर देभाजे हा आरोपी माळाप्पा हेग्गण्णावार याचे पत्नीस शरीरसुखासाठी त्रास देत होता व त्यास समजावून सांगूनही तो ऐकत नव्हता. म्हणून दि.17.04.2023 रोजी मयत सावकर देभाजे यास आरोपी माळाप्पा हेग्गण्णावार याने त्रास कमी होणे करीता लिंबू उतरविणेच्या बहाण्याने मजरेवाडी ते कुरूंदवाड जाणारे रोडलगत असले बी.पी.एड कॉलेजचे पाठीमागे बोलावून घेवून लिंबू उतरविणे करीता सावकर देभाजे याचे दोरीने हात-पाय बांधून त्याचेकडे असले कु-हाडीने सावकर देभाजे याच्या गळ्यावर निघृण वार करून त्याचा खुन केला असलेची माहिती सांगितली आहे. 

सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास कुरूंदवाड पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. बालाजी भांगे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. शैलेश बलकवडे, मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्री. निकेश खाटमोडे-पाटील, मा. परिविक्षाधीन सहा. पोलीस अधीक्षक सो, श्रीमती अन्नपुर्णा सिंग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, जयसिंगपूर विभाग श्री. रामेश्वर वैंजणे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. विनायक सपाटे व श्री. शेष मोरे, कुरूंदवाड पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस निरीक्षक श्री बालाजी भांगे व पोलीस उपनिरीक्षक श्री अमित पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर व कुरूंदवाड पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post