डॉ .पी ए इनामदार ज्या पक्षात होते त्याच पक्षाशी एकनिष्ठ आहेत.

 अपप्रचारापासून सावधान


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  दिनांक 17/ 4 /23 रोजी केंद्र सरकार अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री इक्बाल सिंग लालपुरा यांनी पुणे दौरा करून. मुस्लिम, ख्रिश्चन, सिख्, पारसी ,जैन, बौद्ध व ज्यु अशा अनेक अल्पसंख्याक  शैक्षणिक व धार्मिक संस्थांना त्यांनी भेट दिली. पुण्याच्या आजम कॅम्पस या ठिकाणीही त्यांनी भेट दिली.

 यावेळी आझम कॅम्पस परिसर व तेथील शैक्षणिक सुविधा या सर्व गोष्टी पाहून ते अत्यंत प्रभावी झाले. डॉक्टर पी ए इनामदार साहेब यांनी केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाचे ॲडव्हायझरी कमिटीचे सदस्य पद स्वीकारावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्याच दिवशी सायंकाळी लाल देऊळ (सिनेगॉग) या ठिकाणी पी ए इनामदार साहेब यांना एका कार्यक्रमात आमंत्रित करून ॲडव्हायझरी कमिटीचे सदस्य पद बहाल करून पत्र देण्यात आले. पी ए इनामदार साहेबांना हे सर्व अनपेक्षित होते. त्यांना अशा प्रकारची कोणतीही माहिती नव्हती. परंतु याच घटनेचा काही लोकांकडून  जाणीवपूर्वक अपप्रचार करण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यांच्या मते पी ए इनामदार साहेब यांनी भाजपात प्रवेश केला परंतु अशा लोकांनी लक्षात ठेवावे हा फक्त एक शैक्षणिक कार्यक्रम होता त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. याचा संबंध फक्त अल्पसंख्यांक संस्था व शिक्षण याच्याशीच आहे. डॉ.पी ए इनामदार साहेब ज्या पक्षात होते त्याच पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे कृपा करून कोणीही या घटनेचा अपप्रचार करू नये ही नम्र विनंती.


( शिक्षण महर्षी डॉ. पी ए* *इनामदार साहेब हे युनिव्हर्सिटीचे*चान्सलर आहेत*कृपया  याचीही नोंद* * *घ्यावी)

Post a Comment

Previous Post Next Post