खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा

 "श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात श्री सदस्यांना सेवा" 

प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

 पनवेल : थोर निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खारघर येथे प्रदान करण्यात आला.  16 एप्रिल रोजी लाखो श्री सदस्य महाराष्ट्र व इतर राज्यातून आले होते. त्यांना प्रवासा दरम्यान जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ ता खालापूर येथे सेवा देण्यात आली .या वेळी  शेकडो श्री सदस्यांना  चहा नाश्ता पहाटे 3 वा पासून व्यवस्था करण्यात आली होती . मंदिराचा परिसर श्री सदस्यांच्या येण्याने फुलून गेला होता. यावेळी उपस्थित श्री सदस्यांनी मंदिर परिसरातील इतर सेवांचा सुद्धा लाभ घेतला. पहाटेच मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपल्या पुढच्या महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यासाठी नंतर सर्वजण खारघर येथे मार्गस्थ  झाले.

 

कोट 

ज्येष्ठ निरूपणकार आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांना  महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी लाखो श्री सदस्य खारघर मध्ये आले. यावेळी यांना सेवा देण्याचे भाग्य आम्हा पनवेल- उरणकरांना मिळाले. आमच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिरामधून सेवा म्हणून पहाटेच त्यांना निवास आणि अल्पोपहाराची सेवा देण्यात आली. तसेच खारघर मध्ये आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून केली आहे.:- 

प्रितम जनार्दन म्हात्रे ( माजी.विरोधी पक्षनेता , प. म. पा.)

Post a Comment

Previous Post Next Post