पुणे : आझम कॅम्पस मध्ये शनिवारी 'इफ्तार पार्टी




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : डॉ.पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी ,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, 'अवामी महाज ' सामाजिक संघटना आणि आझम कॅम्पस परिवारातील संलग्न संस्थांच्या वतीने शनिवार ,दिनांक १५ एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्याचे सह पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती या इफ्तार पार्टीला असणार आहे .संस्थेचे प्रमुख आणि कुलपती डॉ.पी.ए. इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. आझम कॅम्पस मधील फंक्शन ग्राउंड वर सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रमजान महिन्यातील उपवास रोजा सोडण्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार असून मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व धर्मीय, सर्वपक्षीय मान्यवर तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.





Post a Comment

Previous Post Next Post