मदती साठी 112 नं.लाभदायक ठरणार तर....

 भांडण तंटा करून त्रास देणाऱ्यांना  112 नं ठरणार कर्दनकाळ..............

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -आता येथून पुढ़े आपल्या घरात ,सार्वजनिक ठिकाणी दंगा मस्ती ,भांडणंतंटा ,मारहाण ,छेड  काढ़ल्यास 112 वर कॉल केल्यास तात्काळ कारवाई होऊन  तक्रारदाराला लगेच न्याय मिळणार.काही दिवसांपूर्वी एक महिला घरगुती कारणातुन नदी उडी घेतली तेव्हा 112 ला माहिती मिळताच एका पोलिस बांधवांने तात्काळ नदीत उडी घेऊन त्या महीलेला बाहेर काढून जिवदान दिले.

काल जुना राजवाडा पोलिसांना 112 नियंत्रण कक्षाला कॉल केला की ,तक्रारदार यांचा मुलगा हा आपल्या बायकोला आणि आई वडीलांच्या अंगावर येऊन मारहाण करत असल्याने मदतीसाठी 112 ला कॉल केला .तात्काळ 112कंट्र्रोल Dispatcher यांनी राजवाडा पोलिस ठाणे 112 चार्लीस कॉल देऊन तात्काळ मदती साठी त्या पत्यावर पोहचण्यास सांगितले .त्यानुसार अंमलदार  PC472 लगारे हे स्पॉट गेले असता तक्रारदार यांचा मुलगा हा टेरेस वर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दिसून आले असता या परिस्थितीचे प्रसंगावधान राखून त्याला आत्महत्ये पासून परावृत्त करून वाचविले. तात्काळ स्पॉट वर पोहचल्यामुळे पुढ़ील अनर्थ टळला.हे 112 या नं  यश आहे .अशा या कामगिरीचे कौतुक होत आहे. म्हणून मदती साठी 112 नं.लाभदायक ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post