इचलकरंजी : सर्व धर्मीय रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी पोलीस दल व मुस्लिम समाज बांधव यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 19/04/2023 रोजी सायंकाळी 6:00  वा च्या सुमारास राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे सर्व धर्मीय रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करणेत आले आहे.

     सदर इफ्तार पार्टीस  जिल्हा पोलीस प्रमुख मा श्री डॉ.शैलेश बलकवडे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक मा श्री निकेश खाटमोडे-पाटील साहेब तसेच पोलिस उपअधीक्षक मा.श्री रामेश्वर वैजने साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी सर्व राजकीय पक्षाचे नेते,सेवाभावी संस्था व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्त्या तसेच हिंदू-मुस्लिम बांधवांनी या इफ्तार पार्टीसाठी उपस्थित रहावे अशी विनंती  इचलकरंजी पोलीस दल मुस्लिम समाज इचलकरंजी यांचे वतीने करण्यात आली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post