खालापूर प्रेस क्लब पत्रकार तर्फे गुरुमाऊली ह भ प रामदास तथा भाई महाराज पाटील यांना आदर्श आध्यात्मिक व्यक्तिमत्व पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आले.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

खालापूर : दिनेश महाडिक :

खालापूर प्रेस क्लब पत्रकार तर्फे गुरुमाऊली ह भ प रामदास तथा भाई महाराज पाटील यांना आदर्श आध्यात्मिक व्यक्तिमत्व पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आले. 

.

आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील थोर प्रबोधनकार ज्येष्ठ कीर्तनकार तसेच तरुणांचे प्रेरणास्थान संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करत असतात .गुरुमाऊली भाई महाराज पाटील यांच्या कीर्तनासाठी विशेषता तरुणांची गर्दी पाहायला मिळते .कारण ते इतिहासातील तारीख ,वार ,महिना, साल हे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मांडत असतात. आणि त्यांच्या कीर्तनामध्ये तरुणांना जे काही इतिहासातील घडलेली न ऐकलेली सत्य घटना सांगून तरुणांना अध्यात्माकडे प्रेरित करत असतात. त्यांच्या या अध्यात्मिक वाणीला व कार्याला प्रेरित होऊन तरुणांची संख्या दिवसेंदिवस परमार्थ कडे आकर्षित होताना दिसते आहे. खऱ्या अर्थाने तरुणांना घडविण्याचे काम भाई महाराज यांच्या माध्यमातून होते .त्यांच्याकडे 33 मुले अध्यात्मिक शैक्षणिक शिक्षण विनामूल्य घेत आहेत या समाजामध्ये त्यांचं हे समाजाप्रती असलेल्या प्रेम पाहता अष्टविनायक क्षेत्र महड येथे अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था सुरू करून अद्याप पर्यंत कीर्तनकार प्रवचनकार हार्मोनियम वादक पखवाज वादक निर्माण केले आहेत .त्यांच्या या कार्याबद्दल खालापूर येथील खालापूर प्रेस क्लब तर्फे त्यांना आदर्श आध्यात्मिक व्यक्तिमत्व पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्कारात सर्वत्र सर्व विविध क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन होत आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे वारकरी संप्रदायाला मिळालेला पुरस्कार आहे

Post a Comment

Previous Post Next Post