दामत भडवळ गावाच्या हद्दीत गोवंशीय जनावरांची कत्तल

 नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमां विरुद्ध गुन्हा नोंद.

प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

कर्जत : - कर्जत तालुक्यातील दामत गावातील काही इसमान विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गोवंशीय प्राण्यांना बेकायदेशीर डांबून ठेवणे क्रुरतेची वागणूक देणे व त्यांची कत्तल करणे आशा प्रकारचे गुन्हे हे नेरळ पोलीस ठाण्यात नोंद असताना, दि.२ एप्रिल रोजी अजुन शेकडो गोवंशीय प्राण्यांची क्रुरतेने कत्तल करून त्या गोवंशीय प्राण्यांची कातडी ही दामत - भडवळ गावाच्या उजव्या बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने टाकली असल्याचा धकादायक प्रकार उघड झाला आहे. 

सदर घटनेची माहिती नेरळ पोलीस ठाण्यास मिळताच नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांन विरोधात गु. र. नं. ८४/२०२३, भा. द. वि. सं. कलम ४२९, २०१, प्राणी संरक्षण अधिनियम ५( ब ) चे उल्लंघन, कलम९ प्रमाणे नोंद करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई श्रीकांत काळे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post