डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल येथे आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून उपलब्ध झालेल्या एक्स रे मशीनचा शुभारंभ


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार सतेज पाटील यांच्या  फंडातून उपलब्ध झालेल्या एक्स रे मशीनचा शुभारंभ आज १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132वी जयंतीचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते आणि उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल येथे करणेत आला.


     पुढील आठवड्यापासुन हे *एक्स रे मशीन (CR SYSTEM)* रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. 

       आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या फंडातून सदर मशीन साठी आवश्यक निधी मंजूर करून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले बद्दल जेष्ठ माजी नगरसेवक शशांक बावचकर यांचा सत्कार आयुक्त यांचे हस्ते करणेत आला.

     याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, माजी सभापती राजाभाऊ कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ एम. एस.जाधव, कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता संजय बागडे आणि सुभाष देशपांडे, नगर रचनाकार रणजित कोरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, लेखापरीक्षक दिलीप हराळे, नितिन सरगर, माजी लेखापरीक्षक के.के.कांबळे, उद्यान पर्यवेक्षक संपत चव्हाण, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव शिंदे, संजय शेटे, संभाजी पोवार, प्रतिभा चौगले, वैशाली पोवार, ज्योती साठे, सुनिता कांबळे, दिलशाद जमादार, मारुती जाधव, सचिन शेडबाळे, दिलीप मगदुम, महेश बुचडे, विकास कांबळे,रोहन कुरणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post