इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  : श्रीकांत कांबळे

  इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती निमित्त शहरातील स्टेशन रोडवरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल नजीकच्या अर्ध पुतळ्यास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमधील प्रतिमेस प्रशासक तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या शुभहस्ते आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.

     


     याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, आणि तहसीलदार कल्पना ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती, त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, माजी सभापती राजाभाऊ कांबळे, डि.एस.डोणे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता संजय बागडे, सुभाष देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ एम.एस.जाधव, नगर रचनाकार रणजित कोरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, लेखापरीक्षक दिलीप हराळे, नितिन सरगर, वाहन अधिक्षक राजेंद्र मिरगे, के.के.कांबळे, नितिन बनगे, शितल पाटील, सदाशिव शिंदे,संपत चव्हाण, संजय शेटे, विजय कोळी, सुभाष आवळे, संभाजी पोवार, प्रतिभा चौगले, वैशाली पोवार ,ज्योती साठे, सुनिता कांबळे, बी.जी. देशमुख, मारुती जाधव, सचिन शेडबाळे, विकास कांबळे,रोहन कुरणे,दिलशाद जमादार आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post