केमिकलयुक्त पाण्यात शिळी झालेली भाजी बुडवल्यानंतर काही क्षणात ती ताजीतवानी


प्रेस मीडिया लाईव्ह :

बाजारात भाजी खरदी करायला गेल्यावर आपण  ताज्या भाज्यांच्या शोधात असतो.ण बाजारात काही असे ही  भाजी विक्रेते असतात जे माणसांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम करत असतात. हो कारण यापुर्वीही भाज्या ताज्या दिसाव्या म्हणून भाजी विक्रेत वेगवेगळ्या रंगांचा वापर करतात, तर भाज्या जलद वाढण्यासाठी हार्मोन्सच्या इंजेक्शन्स वापरतात. 

 तर कधी वांग्यांवर जांभळा रंग फवारतानाचे व्हिडीओ आपण याआधी सोशल मीडियावर पाहिले आहेत. पण सध्या यापेक्षाही धक्कादायक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. हो कारण या व्हिडीओमध्ये कोमेजलेल्या भाजा केमिकलद्वारे अगदी ताजा टवटवीत केल्याचं उघडकीस आलं आहे.


केमिकल टाकून भाज्या केल्या ताज्या –

साधारणपणे, वेळेनुसार भाज्या शिळ्या झाल्या की कोमेजतात आणि कोरड्या पडतात त्यामुळे ग्राहक त्या विकत घेत नाहीत. पण अशा भाज्या विकण्यासाठी एका व्यक्तीने केमिकलचा वापर करुन त्या पुन्हा ताज्या करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो केमिकलमध्ये शिळी भाजी टाकताना दिसत आहे. त्यानंतर ती सुकलेली भाजी हळूहळू फुलू लागते आणि दोन मिनिटांत ताजी दिसायला दिसते. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. तर हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचंही काही लोकांनी म्हटंल आहे.

या केमिकल भाजीचा व्हिडीओ पाहून अनेकांनी अशा प्रकारे भाजी विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय नागरिकांनी योग्य ठिकाणी भाजी खरेदी करण्याचं आवाहन देखील केलं जात आहे. अमित थडानी नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संतापदेखील व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post