मोहोपाड्यातील महावितरण कर्मच्यारास मारहाण करणाऱ्या ग्राहकावर गुन्हा दाखल

 


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

मोहोपाडा कार्यालयांतर्गत रसायनी विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले अतुल चतरकर आपले वरिष्ठ सहा. अभियंता श्री. किशोर कुमार पाटील यांच्या आदेशान्वये आपले सहकारी, विद्युत सहाय्यक अर्पण इंगळे यांच्या सोबत तळेगाव येथे ग्राहकांची थकबाकी वसुली करण्याकरिता गेले असता त्यांना मारहाण केल्याप्रकरणी थकीत वीज बिलधारक रामचंद्र पाटील, त्यांचा मुलगा व इतर एका इसमा विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विद्युत सहाय्यक अतुल चतरकर व अर्पण इंगळे तळेगाव येथे ग्राहकांची थकबाकी वसुलीसाठी गेले होते. तळेगाव येथे राहणारे ग्राहक रामचंद्र पाटील यांचे एका महिन्याचे वीजबिल थकीत असल्याने वसुलीसाठी त्यांच्या घरी गेले होते. अर्पण इंगळे यांनी त्यास बिल भरण्यास सांगितले. सदर इसमाने श्री . अर्पण इंगळे यांना विनाकारण शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. त्यावेळी, अतुल चतरकर यांनी आपल्या मोबाईलमध्ये शुटींग केली असल्याने रामचंद्र पाटील व त्यांचा मुलगा चतरकर यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेतले व शुटींग डिलीट करण्यास सांगितले. चतरकर यांनी शुटींग डिलीट करण्यास नकार दिल्याने रामचंद्र पाटील त्यांचा मुलगा व तेथील उभा असलेल्या एका इसमाने त्यांनासुद्धा शिवीगाळ, दमदाटी करून हाताबुक्याने मारहाण केली व अर्पण इंगळे यांच्या अंगावर धावून त्यांना उद्या गावात ये तुझे या दांडक्याची उपट घालतो असे बोलले असता श्री. इंगळे तेथून निघून गेले.

चतरकर यांनी आपले वरिष्ठ किशोरकुमार पाटील यांना फोनवर सर्व घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. त्यानंतर, किशोरकुमार पाटील यांच्या सोबत जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत रामचंद्र पाटील त्यांचा मुलगा व तेथील एका इसमाविरुद्ध तक्रार करून गुन्हा दाखल केला असून रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा चुकीच्या कृत्यांविरुद्ध महावितरणे धडक मोहीम राबविली असून अशा समाज संकंटकांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल. वीजचोरी हा अदखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा आहे म्हणून ग्राहकांनी अशा असामाजिक कृत्यापासून दूर राहावे व वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे असे आवाहन भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी सर्व वीज ग्राहकांना केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post