समाजात महिलांचा सादैत्व सन्मान व्हावा – उद्योजिका मंजुषा वैद्य .प्रेस मीडिया लाईव्ह :

‘समाजात प्रत्येक महिलेचा सदैव सन्मान व्हायला हवा’ कुटुंबात पुढील पिढ्यांना संस्कारित करताना कुटुंबाचा त्या आधार बनलेल्या असतात त्यांच्यातील कलागुणांना आणि कर्तृत्वाला नेहेमी प्रोत्साहन दिले पाहिजे त्या दृष्टीने ‘जागतिक महिला दिन’ रोज साजरा करा अश्या भावना जेष्ठ उद्योजिका मंजुषा वैद्य यांनी व्यक्त केल्या !अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या .

संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कार व सन्मान वितरण कार्यक्रमात यंदा तन्मयी मेहेंदळे यांना युवा कीर्तनकार हा पुरस्कार देण्यात आला. तसेच रेणुका स्वरूप प्रशालेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग ,आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुजा देवभानकर आणि सरस्वती ज्ञानसुंदर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजता पाठक यांना विशेष पुरस्काराने सन्मनित करण्यात आले.

संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात  संस्थेचे पदाधिकारी अॅड .संयोगीता पागे ,विश्वनाथ भालेराव आणि मकरंद माणकीकर यांसह संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रारंभी नीता पारखी यांनी गणेशस्तवन सादर केले, मधुरा कुलकर्णी यांनी  सुत्रसंचालन केले, आभार अनघा जोशी यांनी मानले.फोटो ओळ :- अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्यावतीने पुरस्कार सोहळ्याचे वेळी डावीकडून अनघा जोशी,मंजुषा वैद्य,तन्मयी मेहेंदळे, मधूरा कुलकर्णी, नीता पारखी. Post a Comment

Previous Post Next Post