उंड्री मध्ये दोन अनधिकृत इमारतींवर पुणे महानगरपालिकेची कारवाई -

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

उंड्री (ता. हवेली) येथील स.नं. ५१ आणि स.नं. ५९ मधील अनधिकृत पाच मजली दोन इमारतीवर जॉ कटरच्या सहाय्याने सुमारे ३० हजार चौरस फूट अनधिकृत क्षेत्र बांधकाम विकास विभाग झोन १ च्या वतीने मोकळे करण्यात आले. मा. अधीक्षक अभियंता युवराज देशमुख व मा. कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत शाखा अभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता गोपाळ भंडारी, कनिष्ठ अभियंता अनुप गज्जलवार आणि पोलीस निरीक्षक राजू अडागाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


सदर कारवाई दहा बिगारी, एक जेसीबी, दोन ब्रेकर आणि एक जॉ कटरच्या साहाय्याने पूर्ण करून दोन्ही इमारती पाडल्या. कारवाई दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोंढवा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post