नेरळ भागातील माणगाव टेकडीवर फडकले १०१ झेंडे.....

  शिवाजी महाराज जयंती निमित्त 

            एसव्हीटीचा उपक्रम

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

     कर्जत तालुक्यातील डोंगरावर लागणारे वणवे रोखण्यासाठी काम करणाऱ्या सगुणा वन संवर्धन समितीच्या वतीने नेरळ परिसर आणि कर्जत तालुक्यातील काही डोंगरावर वणवे लागू नये यासाठी काम या तंत्राच्या माध्यमातून काम सुरु आहे. दरम्यान,त्यापैकी नेरळ जवळील माणगाव टेकडी येथे एसव्हीटीचे काम झालेल्या टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी एकशे एक झेंडे लावण्यात आले. 


      कृषिरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी सगुणा वन संवर्धन समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून जंगलातील वणवे रोखण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यात कर्जत तालुक्यातील आणि नेरळ परिसरातील टेकड्यांवर वणवे रोखण्याचे काम सगुणा वनसंवर्धन कमिटीच्या माध्यमातून सुरु आहे.त्यातील वणवे रोखण्यात यशस्वी ठरलेल्या नेरळ जवळील माणगाव येथील टेकडीवर सगुणा वनसंवर्धन समिती यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयन्ती साजरी करण्यात आली.त्या ठिकाणी टेकडीवर शेखर भडसावळे आणि त्यांच्या टीम कडून तब्बल एकशे एक भगवे झेंडे लावण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख जाणता राजा अशी नावे असलेले झेंडे त्या त्या ठिकाणी असलेल्या खांबांवर हे झेंडे लावले गेले होते.शेखर भडसावळे यांच्यासह सगुणा वन संवर्धन समिती चे सदस्य तसेच कार्यकर्ते यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभाग घेतला. 

    छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्याची हि वेगळी प्रथा यानिमित्ताने पडली असून डोंगरावर एका रांगेत भगवे झेंडे फडकताना दिसत होते.

Post a Comment

Previous Post Next Post