मळसूर येथे सरस्वती मूर्तीची स्थापना महाराष्ट्रामधील पहिले मंदिर

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 राहुल सोनोने  ( मळसुर) :

मळसुर.पातूर तालुक्यातील मळसूर येथील श्री गुरुदेव शारदा मंडळाने व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने मळसुर येथे श्री शारदा सरस्वती मूर्तीची व मंदिराची स्थपणा दि 8 मार्च रोजी करण्यात आली गुरुदेव मंडळाच्या  सतत चाळीस वर्षाच्या अथक  प्रयत्ननाने अखेर मंदिराचा जीर्णोद्धार व सरस्वती मूर्तीची स्थापना करण्यात आली.

 या सरस्वती  मंदिराचे प्रमुख कारण असे आहे की आपल्या भारतामध्ये फक्त हे पाच राज्यामध्ये पाच  मंदिर आहे त्यापैकी तेलंगणा राज्यमधील बासर येथे व केरळ मधील कोटयम शहरात आहे कर्नाटक मधील शिंगेरी राज्यस्थान मधील पुष्कर येथे व मध्यप्रदेश मधील मैहर येथे आहे आणि आता महाराष्ट्र मधील अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मळसुर येथे नव्याने स्थापना झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी मंदिर पाहण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी केली आहे त्यामुळे ह्या मंदिराची जिल्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे सतत सात दिवस होम हवन पूजा आर्चा करून मंदिराचा जीर्णोद्धार झाला व दि 9 मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post