कोल्हापुरात हज यात्रा 2023-24 साठी अर्ज भरण्यासाठी 20 मार्च पर्यंत मुदत वाढ

 प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर दिनांक 12 -  केंद्रीय हज कमिटी व महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या निर्देशानुसार कोल्हापुरात यंदा हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी 2023/24 हज यात्रेचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कोल्हापुरातील दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग येथे सुरू आहे. 10 मार्च 2023 पर्यंत असलेल्या हज फॉर्म भरण्याची मुदत वाढवून आता 20 मार्च पर्यंत करण्यात आली आहे.

यंदा हज यात्रा करण्याची इच्छा असलेल्या यात्रेकरूंनी तात्काळ आपल्या कागदपत्रांसह आपला हज फॉर्म भरावा असे आवाहन हज फौंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर, लिंम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाजी इक्बाल देसाई, तसेच हज फौंडेशनचे उपाध्यक्ष हाजी बालेचांद म्हालदार,हाजी बाबासाहेब शेख,यासिन उस्ताद,इम्तियाज बागवान, सादत पठाण,हाजी समीर पटवेगार,हाजी अस्लम मोमीन,इम्रान आत्तार, रियाज बागवान,नूर मुजावर, यांनी केले आहे.

यंदा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या यात्रेकरूंनी पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड तीन पासपोर्ट साईज रंगीत फोटो,वारसाचे नाव व दोन मोबाईल क्रमांक,अशा कागदपत्रांसह संपर्क साधावा असे आवाहन हाजी इकबाल देसाई, पत्रकार समीर मुजावर यांनी केले आहे.Post a Comment

Previous Post Next Post