किमान वेतनासाठी टिप्परचालकांचा महापालिकेसमोर ठिय्या



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : कचरा उठाव करणाऱ्या टिप्परचालकांना किमान वेतन मिळावे यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात आले. महापालिकेसमोर ठिय्या मांडून किमान वेतन अधिनियमाची अंमलबजावणी करावी यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. किमान वेतन मिळते का नाही हे तपासूनच ठेकेदारांची बिले काढणे अपेक्षित असताना मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

यावर महापालिका प्रशासनासोबत 'आप' शिष्टमंडळाची बैठक पार पडली. ठेकेदारांची बिले काढण्याआधी पगारपत्रक तपासले जाईल, किमान वेतन दिले जाते का नाही हे बघितले जाईल, जे ठेकेदार किमान वेतन देत नाहीत त्यांचे कंत्राट रद्द केले जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले गेले. परंतु, जुनी निविदा रद्द करून नवीन निविदा काढावी, निविदेचा कालक्रम जाहीर करावा अशी मागणी उपायुक्त अडसूळ यांच्याकडे लावून धरल्याने तोडगा निघू शकला नाही. यानंतर 'आप'ने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. निविदेचा कालक्रम निश्चित करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करू असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले. ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

यावेळी सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, उत्तम पाटील, संजय साळोखे, उषा वडर, एस्थेर कांबळे, विजय हेगडे, दुष्यंत माने, विलास पंदारे, उमेश वडर, प्रसाद सुतार, समीर लतीफ, अमरसिंह दळवी, भाग्यवंत डाफळे, संजय नलवडे, बसवराज हदीमनी, कुमार साठे, युवराज कवाळे, रणजित बुचडे, करण चौधरी, जयसिंग चौगुले आदी उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post