पन्हाळगडावरील सज्जा कोठीवरून एक तरुण दरीत पडला , त्याची प्रकृती गंभीरप्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर मधील पन्हाळगडावर एक दुर्घटना घडली आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना किल्ले पन्हाळगडावरील सज्जा कोठीवरून एक तरुण दरीत पडला आहे.शनिवारी रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. नागेश तरडे असे दरीत पडलेल्या तरुणाचे नाव असून, तो गंभीर जखमी आहे.आगामी मराठी चित्रपट 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा तरुण मावळ्याच्या वेशात होता. यावेळी तो फोटो ग्राफी साठी सज्जा कोठीच्या तटबंदीवर चढला. त्यावेळी पाय घसरून तो दरीत पडला. त्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.


सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post