राजाराम हायस्कूल जुनियर कॉलेज ,कोल्हापूर " येथे शालेय आंतरवासिता सांगता समारंभ संपन्न झाला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप ,संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बीएड्.) पेठवडगाव येथे बी.एड्. द्वितीय वर्षातील सेमिस्टर तीन मधील शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिकांतर्गत गट क्रमांक दोन "मेन राजाराम हायस्कूल जुनियर कॉलेज ,कोल्हापूर " येथे शालेय आंतरवासिता सांगता समारंभ संपन्न झाला. 


कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.नाईक एस .एस सर ,प्राचार्य मेन राजाराम हायस्कूल जुनियर कॉलेज कोल्हापूर. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या सौ निर्मळे आर. एल. तसेच प्रमुख उपस्थिती मेन राजाराम हायस्कूल  च्या अध्यापिका मा.पठाण एच. जे .मॅडम , माननीय नाईक आर. वाय. सर, माननीय पाटील एस .एस. मॅडम अध्यापिका मेन राजाराम जुनियर कॉलेज कोल्हापूर. तसेच इतर उपस्थितीमध्ये प्राध्यापिका शिरतोडे मॅडम ,प्राध्यापक सोरटे सर ,प्राध्यापिका सावंत मॅडम ,प्राध्यापिका चरणकर मॅडम उपस्थित होते. तसेच आंतरवासिता गटातील सर्व छात्राध्यापक छात्राध्यापिका उपस्थित होते. या गटाचे शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिक प्राध्यापिका जे. एस .चरणकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय छात्राध्यापिका प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी वडर व सुप्रिया पाटील यांनी केले. आंतरवासिता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे , अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षकी पेशात शिक्षक हा रोज काहीतरी नवीन अनुभव घेत असतो म्हणजे तो नव्याने शिकतच असतो. याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून विविध पदांच्या परीक्षा द्याव्या अस  मा. नाईक सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पाटील मॅडम यांनी आपली देह बोली , भाषा, वाचन आपले विचार कसे असावे,ते समोरच्या व्यक्तीच्या मनावर कसे भिडतील , आपले विचार कसे मांडावे,आणि बदलत्या काळानुसार आपण ही बदलले पाहिजे . नाविन्याचा शोध घेतला पाहिजे . असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्या आर्. एल निर्मळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे त्याच्या कामाबद्दल कौतुक केले. तसेच शाळेतील विद्यार्थी आणि बी. एड चे प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये निर्माण झाले आदरयुक्त नाते याचा दाखला उदाहरण देत गुरु शिष्याच महत्त्व सांगितले. तसेच मेन राजाराम हायस्कूल चे प्राचार्य व सर्व शिक्षक स्टाफ यांचे आभार मानले. आंतरवासितेमधील अभिरूप छात्र मुख्याध्यापिका वृषाली नामे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रियंका पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाच्या शेवटी छात्राध्यापक अनिकेत कापडे यांनी आभार मानले. अशाप्रकारे 15 डिसेंबर पासून चालू असलेल्या शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिकाची प्राचार्यांच्या संमतीने सांगता झाली..

Post a Comment

Previous Post Next Post