छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजनप्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पनवेल शहरातील महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. तसेच यावेळी शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी येथून पनवेल येथे आलेल्या मशालीचे स्वागत केले. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे करण्यात आले होते. 

      आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य कलाकारांनी सादर केले. यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर,  तहसिलदार विजय तळेकर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख , मा.सभागृह नेते परेश ठाकूर,  मा.नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, सौ.प्रीती जॉर्ज, सौ.सारिका भगत,पनवेल अर्बन बँकेच्या मा.संचालिका सौ.माधुरी गोसावी ,पालिका अधिकारी तसेच अनेक शिवभक्त उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post