मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माध्यम कक्षाला भेटप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  :- जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी भेट दिली. माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवडणूक उपजिल्हाधिकारी आरती भोसले, माध्यम संनियंत्रण समन्वयक डॉ.पुरुषेात्तम पाटोदकर, प्रसिद्धी समन्वयक डॉ.किरण मोघे, निवडणूक तहसीलदार रुपाली रेडेकर, सहायक संचालक जयंत कर्पे उपस्थित होते.

माध्यम कक्षाद्वारे पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाज माध्यमे आदींवरील निवडणूक विषयक मजकूर, विविध माध्यमातील निवडणूक विषयक वृत्तांच्या नोंदी, निवडणूक विषयक बातम्यांना मिळालेली प्रसिद्धी, समाज माध्यमातील निवडणूक विषयक मजकूर आदींचे  श्री.देशपांडे यांनी अवलोकन केले आणि  त्याविषयी माहिती घेतली.

इलेक्ट्रॉनिक माध्यमामधील निवडणूक विषयक मजकूरावर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या यंत्रणेची त्यांनी पाहणी केली व त्याविषयी समाधान व्यक्त केले. माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीमार्फत प्रमाणिकरण करण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती यावेळी डॉ.पाटोदकर यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. प्रसृत करण्यात आलेल्या बातम्या आणि वृत्तपत्रातून मिळालेली प्रसिद्धी याची माहिती डॉ.मोघे यांनी दिली. माध्यम कक्षात नियुक्त अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते


Post a Comment

Previous Post Next Post