नैना विरोधात बोर्ले गाव बंद आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे साहेबांची प्रमुख उपस्थिती......

ही तर भाकरी वाचवण्यासाठी ची लढाई.......समाजाच्या एकाही अंगाच्या फायदा नाही...........प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

28 फेब्रुवारी मंगळवार आज नैनाच्या निषेधार्थ शिरढोण गाव बंद आंदोलन पार पडलं यानिमित्ताने आयोजित बैठकीत 300 पेक्षा जास्त ग्रामस्थांनी भाग घेतला आणि नैना प्राधिकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला. आजच्या उपस्थितीवरून गावातून प्रत्येक घरातून माणसा आणली होती हे जाणवलं कोणत्याही परिस्थितीत नैना नको हीच भूमिका घेऊन सर्व ग्रामस्थ उतरलेले जाणवले.

      


       याप्रसंगी मार्गदर्शन करत असताना जे एम म्हात्रे साहेब यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन* व्यक्त केले नैना प्राधिकरणाच्या जाचक अटी समजाऊन सांगताना,1984 सालच्या लढ्याची आठवण करून दिली.त्या लढ्याचे साक्षीदार असल्याचे देखील सांगितले.

        नारायणशेठ घरत यांनी देखील 1984 च्या ऐतिहासिक लढ्यातील आठवणी मांडल्या त्या काळात अगदी महिला वर्ग सुद्धा पेट्रोल उठला होता आपल्यावर होणारे अन्यायाची त्यांना जाणीव झाली होती शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दिगंबर बाळू पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा आपण जिंकला आणि साडेबारा टक्के चा निर्णय पदरी पाडून घेतला.लढ्याच्या आठवणी सांगताना या लढ्यात जे एम म्हात्रे साहेब , जी आर पाटील साहेब सुद्धा रक्तबंबाळ झाल्याचं नारायणशेठ घरत यांनी सांगितलं.

       राजेश केणी यांनी गाव बंद आंदोलनाची संकल्पना आणि आपला हेतू स्पष्ट केला. तरुणांनी नैनाच्या अन्यायाला गांभीर्यपूर्वक घेणे गरजेचे असल्याचं श्री राजेश केणी  यांनी सांगितलं. क्रिकेट खेळणारे संघ, आयोजक, समालोचक या मंडळींनी सुद्धा जनजागृतीसाठी आपल्या व्यासपीठाचा वापर करावा अशी विनंती केली.तसंच वेळ आली तर 1984 साली झालेल्या संघर्षासाठी देखील  तयार राहुयात असे मत श्री के यांनी मांडले.

एम एम आर डी ए ,एम एस आर डी सी ,महानगरपालिका आणि नयना प्राधिकरण यामध्ये तुलनात्मक अभ्यास केला तर नैना प्राधिकरण किती अन्यायकारी आहे याची माहिती राजेश केणी यांनी दिली.

          शेखरजी शेळके यांनी देखील ग्रामस्थांना मार्गदर्शन* करत असताना साध्या सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला. आपल्या अनोख्या शैलित बोलताना त्यांनी स्थानिक नेत्यांना या लढ्यामध्ये सामील होण्याचे आवाहन केले. किंबहुना त्यांना नयना प्राधिकरण योग्य वाटत असेल तर ते खुलेआम ग्रामस्थांमध्ये येऊन पटवून द्यावे असे मत देखील व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post