पेठ वडगाव : मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन",निमित्त "काव्यवाचन व पोस्टर प्रेझेंटेशन " घेण्यात आले.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव येथे "मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन",निमित्त "काव्यवाचन व पोस्टर प्रेझेंटेशन " घेण्यात आले. प्रथमतः कवी कुसुमाग्रज व सी. व्ही. रामण यांची प्रतिमा पूजन करण्यात आले. मराठी राजभाषा दिनानिमित्त काव्य वाचन घेण्यात आले त्या मध्ये कुसुमाग्रजांच्या कवितांचे काव्य वाचन घेण्यात आले.

 या कार्यक्रमात सर्व छात्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाशी संबंधित पोस्टर प्रेझेंटेशन घेण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता चौगुले व प्राजक्ता पाटील यांनी केले. छात्राध्यापिका दिव्या माने व दिपाली गुरव यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विज्ञान दिनानिमित्त मानिनी जाधव व प्रतीक्षा पालकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या सौ.आर.एल. निर्मळे चौगुले यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्व व विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा व्यवहारिक जीवनात उपयोग, त्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमास प्रा. शिरतोडे ,  व्ही.एल.,प्रा.सोरटे. एस.के.,प्रा. सावंत ए.पी., प्रा.चरणकर जे.एस., चौगुले एस.एस., तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक, छात्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post