पुणे पोटनिवडणुकीचा निकाल उद्या : मतदारांचा कौल कोणाकडे हे उद्याच समजणार..

 भाजपा आणि काँग्रेसच्या हक्काच्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवार किती मताधिक्य घेतात, यावरही विजयाचे गणित निश्चित होणार .


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : कसबापेठ विधानसभा मतदार संघा मध्ये ५०.०६ टक्के इतके मतदान झाले.तर पिंपरी चिंचवडसाठी ५०.४७ टक्के मतदान झाले आहे कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत आहे. ही लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे बोलले जाते. मतदारांचा कौल कोणाकडे हे उद्याच समजणार.. 

कसबा पेठेसाठी मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे. तर चिंचवडसाठी मतमोजणी थेरगाव येथील शंकरअण्णा गावडे कामगार भवनात होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कसबा पेठ मतमोजणीसाठी १४ टेबल करण्यात आले आहे. मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. एका फेरीसाठी सुमारे १५ ते २० मिनिटांचे वेळ लागणार आहे. म्हणजे पहिल्या फेरीचा निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत येणार आहे. दुपारी १२ पर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसबा पेठेतील सदाशिव, नारायणपेठ , शनिवार पेठांमधील मतदानाची टक्केवारी 2019 च्या तुलनेत पाच टक्के घटल्याचे समोर आले आहे. तर 2019 मध्ये आमदार मुक्ता टिळक यांना या विभागातून तब्बल 21 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता हा धक्का नेमका कुणाला बसणार..? यावर जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपा आणि काँग्रेसच्या हक्काच्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवार किती मताधिक्य घेतात, यावरही विजयाचे गणित निश्चित होणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post