मनसेचे दीपक कांबळी यांच्यावतीने विविध मागण्यांकरिता पाताळगंगा एमआयडीसीला निवेदन...प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पाताळगंगा एमआयडीसी यांची रहिवासी वसाहत मोहपाडा येथे आहे. या वसावतीमध्ये विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. उदाहरणार्थ या वसाहतींमधील रस्ता हा संपूर्णपणे खराब झालेला असून संपूर्ण रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे या रस्त्यावरील अनेक पथदिवे (स्ट्रीट लाईट) बंद आहेत, त्याची योग्य ती देखभाल करण्यात यावी 

त्याचप्रमाणे  ह्या वसाहतीमध्ये कचऱ्याची समस्या अनेक वर्षापासून आहे. मुख्यतः जनता विद्यालय त्याचप्रमाणे प्रिया शाळा येथील हजारो विद्यार्थी व नागरिक याच रस्त्याने जाये करत असतात , मोहोपाडा कॉर्नर येथे कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो व त्याची दुर्गंधी या रस्त्यावर पसरलेली असते याचा त्रास मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना व नागरिकांना होत आहे त्यावर लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढण्यात यावा, त्याचप्रमाणे पाताळगंगा नदी वरील एमआयडीसी कारखान्यांना जोडणारा पूल हा अनेक वर्ष बंद आहे व शेजारील पुलावरून दुहेरी वाहतूक होत असते त्या ठिकाणी या अगोदर बरेच अपघात झाले आहेत ,भविष्यात अपघात होऊन जीवित हानी होण्याची मोठी शक्यता आहे. तरी शेजारील पूल लवकरात लवकर दुरुस्त किंवा नव्याने बांधण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन  मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. दीपक कांबळी यांच्या तर्फे एमआयडीसी चे वरिष्ठ अधिकारी श्री. राऊत साहेब यांना देण्यात आले. राऊत साहेबांनी चर्चेदरम्यान सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post