महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणारप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकी मध्ये महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. मनसेने या निवडणुकीत आपला उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आहे . कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी धंगेकरांना विजयी करण्याच्या उद्देशाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर रोजी निधन झाले होते. भाजपचेच आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे 3 जानेवारी रोजी निधन झाले होते. या दोन्ही आमदारांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागांवर पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून इथे 27 फेब्रुवारी रोजी मतदान तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विरूद्ध भाजपचे हेमंत रासने अशी लढत होणार आहे. तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे नाना काटे विरूद्ध भाजपच्या अश्विनी जगताप अशी लढत होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post