कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मत मोजणी येत्या गुरुवार पासून होणार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मत मोजणी येत्या गुरुवार दिनांक  2  रोजी होणार असून ही मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे होणार आहे.मतमोजणीला सुरवात सकाळी 8 वाजता  होणार आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. साधारणपणे एका फेरीसाठी सुमारे 15 ते 20 रमिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यानुसार कसब्याच्या निकालाचे चित्र दुपारी 12   वाजण्याच्या सुमारास स्पष्ट होणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची पूर्वतयारी सुरू आहे. ईव्हीएम मधीन कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. या ईव्हीएम स्ट्रॉंग रुम मध्ये ठेवण्यात आल्या असून, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.एका मतमोजणी टेबलावर एक मतमोजणी निरीक्षक, सहायक मतमोजणी निरीक्षक, मतमोजणी सहायक असे तीन कर्मचारी -अधिकारी असतील. उमेदवारांच्या संख्येनुसार मतमोजणीसाठी किती वेळ लागेल याचा अंदाज येतो. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी 16 उमेदवार आहे. त्यानुसार पहिल्या फेरीचा निकाल सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हाती येणार आहे. तर दुपारी निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण झाल्यावर “व्हीव्हीपॅट’ मशीनची मोजणी करण्यात येणार आहे. फक्त पाचच व्हीव्हीपॅट मशीनमधीलच चिठ्ठ्यांची मतमोजणी केली जाणार आहे. विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे चिठ्ठ्या टाकून पाच मतदान केंद्र “व्हीव्हीपॅट’ची मतमोजणी करण्यासाठी निवडणार आहे. “व्हीव्हीपॅट’ मशीन उघडल्यावर 25 चिठ्ठ्यांचा एक बंडल करून त्यानंतर मतमोजणी केली जाणार असून “व्हीव्हीपॅट’मशीनमध्ये उमेदवारला मिळालेली मते आणि ईव्हीएममधील मते यांचा ताळमेळ पाहिला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post