उसने घेतलेले पैसे परत न केल्यावरून टोळक्याकडून हातोडा व तलवारीने मारून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केलाप्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : हात उसने घेतलेले पैसे परत न केल्यावरून टोळक्याने दारावर कोयते, हातोडा व तलवारीने मारून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची  खळबळजनक घटना साईनाथनगर या भागात घडली आहे. 

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात  बलजिंदर भट्टी (वय ५६) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी रिंकु कलवंतसिंग चौहान (वय ३४, रा. पिंपरी) व बिट्टु सुखदेवसिंग माही (वय २७) यांना अटक केली आहे. तर, इतर तीनजन फरार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. तक्रारदार यांच्या वडिलांनी रिंकू चौहान याच्याकडून हात उसने पैसे घेतले होते. ते पैसे त्यांनी परत केले नव्हते. त्या रागातून आरोपी त्यांच्या घरी आले. त्यांनी दारावर हातोडा, कोयता व तलवारीने मारून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली. तसेच, दोघांना अटक केली. पण, त्यांचे इतर तीन साथीदार पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post