मनसेतून शिंदे गटात आलेले निलेश माझिरे यांच्या पत्नीने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : मनसेतून शिंदे गटात आलेले निलेश माझिरे यांच्या पत्नीने पुण्यात राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.  त्या मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं कळतं. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.शिंदे गटाचे बाळासाहेबांची शिवसेना माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.


माझिरे यांच्या पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका काय होता हे अजून कळलेलं नाही.माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. पुण्यातील डॅशिंग नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थ होते.


Post a Comment

Previous Post Next Post