गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे

 सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार

इथे ओशाळला मृत्यू ओव्हरफुल


प्रेस मीडिया लाईव्ह :

कलाकार हा प्रक्षेकांच्या मनात व डोळ्यात भरलेला असतो. कलाकार आपली संपूर्ण ताकत आपल्या कलेतून सादर करीत असतो. मंत्री असताना देखील वेळ काढून रंगमंचावर नाटक उभे करणे सोपे नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे विचार संपूर्ण श्रद्धेने मंत्री गोविंद गावडे सादर करतात. महाराजांच्या विचाराबरोबर ते रंगभूमीचीही सेवादेखील त्यांच्या हातून होत आहे, असे गौरवोग्दगार माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जागतिक मराठी अकादमीच्या वतीने श्री सिद्धीनंदन थिएटर गोवा प्रस्तुत इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचा प्रयोगात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी साकारली. याप्रसंगी गोविंद गावडे यांचा माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची उपस्थिती होती. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, दिग्दर्शक मकंरद जावडेकर, संवादचे सुनिल महाजन, सचिन ईटकर, गौरव फुटाणे, रविंद्र डोमाळे, मॅप अडमेड, प्रशांत पवार आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महारांजाची ऐतिहासिक भूमिका गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी साकारल्याने यावेळी बालगंधर्व रंगमंदिरात प्रक्षेकांची तुडूंब गर्दी झाली होती. गोव्याचे मंत्री बालगंधर्व रंगमंदिरात अभिनय करीत असल्याने ही सर्वांनी अनोखी बाब वाटली. टाळ्यांच्या गजरात व जय भावनी जय शिवाजी घोषणांनी रंगमंदिर दूमदूमले होते.

शिंदे म्हणाले, कलाकार हा ताकतीने अभिनयातून प्रक्षेकांच्या मनामध्ये घर करीत असतो. हा कलाकार प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये भरलेला असतो. एखाद्यी भूमिका साकारणे ही सोपी गोष्ट नाही. मी देखील महाविद्यालयात असताना नाटकाचे प्रयोग सादर केले होते. त्यामुळे मला याची जाणीव आहे. कामातून वेळ काढून  रंगभूमीसाठी, प्रेक्षकांसाठी सेवा करणे हे कौतूकास्पद असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मंत्री गोविंद गावडे यांनी आपल्या पूर्ण ताकतीने छत्रपती संभाजी राजे उभे केले आहे. त्यांचे असेच कार्य पुढे सुरु राहोत, महाराजांचे विचार कोनाकोपर्‍यापर्यंत पोाहोव्यात अशा शुभेच्छा यावेळी ज्येष्ठ कलाकार  मोहन आगाशे यांनी दिल्या.

आपली भाषा, संस्कृती टिकवून ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या संरक्षणासाठी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांचे विचार तरुण पिढीने पुढे नेले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज  जन्माला येत नसतात, ते घडवावे लागतात. आजच्या काळात संस्कार करणेदेखील महत्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणपिढीने  आपल्या आयुष्यात अंमलात आणल्यास त्यांना यशापासून कोणीही रोखू शकत नाही. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार तरुण पिढीने आत्मसात करावे, असे अवाहन यावेळी गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामदास फुटाणे यांनी केले. सुत्रसंचालन व आभार स्नेहल दामले यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post