पुणे : शनिवारी कात्रज, कोंढवा भागात पाणी पुरवठा बंद राहणारप्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे -समान पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत कोंढवा बुद्रुक येथील केदारेश्‍वर व कात्रज येथील महादेव मंदिर साठवण टाक्‍यामध्ये येणारे पाणी मोजण्यासाठी राजीव गांधी पंपिंग स्टेशन कात्रज येथे 1300 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या शनिवारी (दि. 25) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी उशिरा तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग...

कात्रज गावठाण, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष सोसायटी, भूषण सोसायटी, ओमकार सोसायटी, राजस सोसायटी, वरखडेनगर, माउलीनगर, शिवशंभोनगर, गोकुळनगर, सुखसागरनगर भाग- 1 व 2, साईनगर, गजानननगर, काकडे वस्ती, गंगाधाम शत्रुंजय रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, टिळेकरनगर, येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक गावठाण, श्रद्धानगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, तालाब कंपनी परिसर, लक्ष्मीनगर, आंबेडकरनगर, खडी मशिन परिसर, बधेनगर, राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर परिसराचा काही भाग.

Post a Comment

Previous Post Next Post