निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचे प्रशिक्षण

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे. :- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान कामकाजासाठी  मतदान केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण निवडणुक विभागामार्फत  निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय थेरगाव येथे देण्यात येत आहे. 

 मतदान प्रक्रीयेवेळी मशीन सीलबंद करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचे प्रशिक्षणदेखील या ठिकाणी दिले जात आहे. मतदारांनादेखील ईव्हीएम यंत्रावर मताधिकार बजावण्यासाठी माहितीपर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी  ११ ते सायंकाळी  ५ वाजेपर्यत प्रशिक्षण सुरु राहणार आहे. या उपक्रमाची पाहणी निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांनी केली. या उपक्रमाला  नागरिकांचा  चांगला  प्रतिसाद मिळाला.

अशिक्षित, वयोवृद्ध, नवोदित मतदारांना ईव्हीएम यंत्राद्वारे मताधिकार बजावताना  कोणत्याही अडचणी येऊ नये, यादृष्टीने त्यांना माहिती दिली जात आहे.  नागरिकांनी सकाळी  ११ ते सायंकाळी  ५ या वेळेत या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

निवडणूक साहित्याची पूर्वतयारी सुरू

मतदानाच्या दिवशी आवश्यक निवडणूक साहित्याचे पॅकींग आणि वितरणाच्या कामाची पाहणी निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी केली आणि संबंधितांना मार्गदर्शन केले. निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांच्या नियंत्रणाखाली तज्‍‌ज्ञ प्रशिक्षक म्हणून  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक आणि निदेशक यांची नेमणूक  या कामकाजासाठी करण्यात आली आहे. 


००००

Post a Comment

Previous Post Next Post