कोल्हापूर क्राईम : गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी बोगस डॉक्टरसह एजंटला अटकप्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : गर्भलिंग निदान , स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी बुधवारी (ता.२२) रात्री बोगस डॉक्टरसह एजंटला अटक केली. बोगस डॉक्टर विठ्ठल हिंदुराव निकम (वय ३९, रा. सावर्डे दुमाला, ता. करवीर) आणि एजंट संजय आप्पासो गोंधळी (वय ४५, रा. सुळकुड, ता. कागल) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. या गुन्ह्यात एकूण १८ संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी १४ जणांना अटक झाली असून, चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापे टाकून राधानगरी आणि भुदरगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यापैकी राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एकूण १८ संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील १२ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, बुधवारी रात्री विठ्ठल निकम आणि संजय गोंधळी या दोघांना अटक केली. निकम हा बोगस डॉक्टर आहे, तर गोंधळी हा एजंट म्हणून काम करीत होता. न्यायालयात हजर केले असता दोघांना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिसकोठडी मिळाली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post