पुणे शहरात प्रीपेड रिक्षा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झालाप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य बाबा शिंदे आणि इतर सदस्यांनी शहरात प्रीपेड रिक्षासेवा पुन्हा सुरू करण्यासाठी  वाहतूक पोलीस उपायुक्‍त विजयकुमार मगर यांची नुकतीच भेट घेतली. शिंदे यांच्या मागणीला वाहतूक पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे  पुणे शहरात प्रीपेड रिक्षा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पुणे शहरात रिक्षाने प्रवास करताना प्रवाशांना नेहमीच जवळचे भाडे नाकारणे, गैरवर्तनूक, जास्तचे भाडे आकारने असे विविध अनूभव येत असतात. रिक्षा चालकांविरूद्ध तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया किचकट असल्याने नागरिक तक्रार करत नाहीत. पण, गेल्या काही दिवसांपासून ओला आणि उबेर प्रमाणे शहरात प्रीपेड रिक्षा सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. तसेच रेल्वे प्रशासनाने देखील वाहतूक पोलीस उपायुक्‍त यांच्याशी चर्चा करून पुणे स्टेशन येथून प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक शाखेने प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याला हिरवा कंदील दाखवला असून पुढच्या दहा ते पंधरा दिवसात तीन ठिकाणी ही सेवा सुरू होणार आहे. शहरात सर्वात वर्दळीचा परिसर म्हणजे स्वारगेट, पुणे स्टेशन आणि वाकडेवाडी बसस्थानक याठिकाणी ही सेवा सुरू होणार आहे.

– विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्‍त, वाहतूक शाखा पुणे

Post a Comment

Previous Post Next Post