कॅप्टन जी. बी. पाटील हायस्कूल, कोडोली ' येथे शालेय आंतरवासिता सांगता समारंभ संपन्न झाला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

 श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप ,संचलित "कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठवडगाव" येथे बी.एड्. द्वितीय वर्षातील सेमिस्टर 3 मधील "शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिका अंतर्गत " गट क्रमांक तीन 'कॅप्टन जी. बी. पाटील हायस्कूल, कोडोली ' येथे शालेय आंतरवासिता सांगता समारंभ संपन्न झाला.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अमृता धोंडीराम जाधव ,दिवाणी न्यायाधीश व न्याय दंडाधिकारी . अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या सौ. निर्मळे आर.एल. तसेच प्रमुख उपस्थिती कॅप्टन जी. बी. पाटील शाळेचे संस्थापक एम. डी. पाटील सर, शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. पाटील सर, शाळेच्या कार्यवाहक सौ. साधना पवार मॅडम, शाळेचे मार्गदर्शक प्रताप पवार सर, तसेच इतर उपस्थितीमध्ये प्राध्यापिका शिरतोडे मॅडम, प्राध्यापक सोरटे सर व प्राध्यापिका चरणकर मॅडम उपस्थित होते. तसेच आंतरवासिता गटातील सर्व छात्राध्यापक ,छात्राध्यापिका उपस्थित होते. या गटाचे शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिक प्राध्यापिका ए.पी. सावंत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्राध्यापिका ज्योती फडतरे हिने केले . प्रमुख पाहुण्यांचा परिचय ऐश्वर्या पवार हिने केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा पिसाळ व ऐश्वर्या पवार यांनी केले. आंतरवासिता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आंतरवासितेमधील अभिरूप छात्र मुख्याध्यापिका दिपाली खोत हिने आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाच्या शेवटी छात्राध्यापिका सना मोमीन हिने आभार मानले. अशाप्रकारे 15 डिसेंबर पासून चालू असलेल्या शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिकाची प्राचार्यांच्या संमतीने सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post