छात्रभारती पुणे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुस्तकांचे वाटप

 प्रेस मीडिया लाईव्ह :

  जयसिंगपूर : प्रतिनिधी

      रविवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छात्रभारती पुणेच्या वतीने आंबेगाव व विश्रांतवाडी येथील मुलांच्या व मुलींच्या समाजकल्याण वसतिगृहा मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. 

यावेळी छात्रभारतीचे तुकाराम डोईफोडे व सौरभ शिंपी यांनी गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष छाया काविरे, मिलिंद कांबळे व राजवीर थोरात यांनी 'सर्व सामान्यांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज' व 'छात्रभारती' या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.  

      कार्यक्रमाचे दिव्या कांबळे, सुदर्शन शिंदे, वैभव रंधे, अर्पिता पवार, वैष्णवी शिंपी, दिनेश पारिट यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Post a Comment

Previous Post Next Post