आज पासून बारावीची परीक्षा ; परीक्षा केंद्रावर जमावबंदीचे कलम 144 लागू

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 बारावी बोर्डाच्या परीक्षेला राज्यभरात आज मंगळवार पासून सुरूवात होत आहे. कोविडच्या साथीनंतर दोन वर्षांनी पुन्हा पूर्ववत परीक्षा नेहमीप्रमाणे ऑफलाईन होणार आहे. या वेळी प्रथमच कॉपी टाळण्यासाठी परीक्षेचा पेपर निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपूर्वी देण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शेवटची दहा मिनिटे वाढवून देण्यात येणार आहेत. यंदा 14 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी चोख तयारी केली आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा आज पासून सुरू होत आहे. कोरोनानंतर प्रथमच ही परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन होत आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. कोरोनानंतर प्रथमच ही परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन होत आहे. यंदा संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. कोरोनाकाळात दहावीच्या विद्यार्थ्यांना मेरिटवर पास करण्यात आले होते. त्यामुळे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्येत मोठी वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे.

जमावबंदीचे कलम 144 लागू

बारावीच्या परीक्षेसाठी यंदा कॉपी रोखण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर जमावबंदीचे कलम 144 लागू केले आहे. तर केंद्रांवर कॉपी रोखण्याकरीता विशेष भरारी आणि बैठी पथके गस्त घालणार आहेत. पेपरफूट टाळाण्यासाठी परीक्षा केंद्रावर दहा मिनिटाआधी प्रश्न पत्रिका पुरविण्याच्या नियमाबदल केला आहे. केंद्रावर पन्नास मीटर परिसरात विद्यार्थ्यांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, तसेच पेपर लिहीताना शेवटी दहा मिनिटे वाढविण्यात येतील.

सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

पन्नास मीटर अंतरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षेची जय्यद तयारी करण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप सुरू आहे. मात्र असे असेल तरी बारावीचे प्रॅक्टिकल पार पडले आहे. जर कोणत्या महाविद्यालयात प्रॅक्टिकल राहिले असेल तर थिअरीनंतर प्रॅक्टिकल देण्याची सोय करण्यात आली आहे. कोरोनाकाळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. आता पुन्हा पूर्वी प्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post