सुक्षेत्र कूडलसंगम येथे लिंगायत धर्म संस्थापना दिनानिमित्त धर्मगुरु बसवण्णा ३६ वा शरण मेळावा दिनांक १२ , १३ , १४ जानेवारी रोजीप्रेस मीडिया लाईव्ह : 

महामानवातवादी, लिंगायत धर्म संस्थापक, धर्मगुरु महात्मा बसवेश्वरांच्या कारणिकत्वात व संदेशात विश्वास ठेवून चालणारे बसव भक्त, बसव अभिमानी, बसव धर्मिय लिंगायत व बसव तत्व अभिमानी असे सर्व वर्षातून एकदा तरी जमावेत ही अत्यंत आवश्यक बाब आहे. परस्पर बंधुत्व व समानता वाढीस लावण्यासाठी याची गरज आहे. या उद्देशानेच आदि शरणांच्या संकल्पा प्रमाणे शरण मेळावा भरविण्यात येत आहे. 

धर्मकर्ता बसवेशांची विद्याभूमी, तपोभूमी व ऐक्यस्थळ (समाधी) असलेल्या कूडलसंगमला लिंगायत (बसव) धर्मियांचे धर्मक्षेत्र समजून १४, १५ व १६ जानेवारी १९८८ या दिवशी ऐतिहासिक प्रथम शरण मेळावा भरविण्यात आला. हा शरण मेळावा अडीच लाखाहून अधिक लोकांचा आकर्षण बिंदू ठरला होता. असा शरण मेळावा दर वर्षी धर्मसंस्थापना दिना निमित्त भरविला जात आहे. 

३६ वा शरण मेळावा १२, १३ व १४ जानेवारी २०२३ रोजी साजरा होत आहे. सामुहिक प्रार्थना, सामुहिक लिंगपुजा घणलिंग दर्शन हे शरण मेळाव्याचे प्रमुख धार्मिक विधी आहेत. दि. १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ध्वजारोहण, पथ संचलन व सामुदायिक प्रार्थना असते. (तीन दिवस भाग घेणे शक्य नसणाऱ्यांनी या समुदाय प्रार्थनेत भाग घेणे आवश्यक आहे) सकाळी ७ वा. सामुहिक इष्टलिंगपूजा असते. या कार्यक्रमात शरण व्रत धारकांनी भाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. ४०, ३०, २० व १० दिवस असे आपल्या सवडीनुसार शरण व्रत स्विकारुन आचरण करून कोणीही शरण मेळाव्यात सहभागी होवू शकता. चिंतन गोष्टी, भाषणे, धार्मिक ललित प्रश्ने इत्यादी कार्यक्रमांनी भरलेला शरण मेळावा उत्तम ज्ञान दासोहा बरोबरच, अन्नदासोह पण व्यवस्थित रितीने करण्यात येतो. दि. १३ व १४ सेजी धर्म चिंतन, चर्चागोष्टी होत असून समाज व लिंगायत धर्म यांना संबंधीत विषयावर मुक्त चर्चा करण्यास संधी असते.शरण मेळाव्यासाठी धन सहाय्य श्री शरण मेळावा हा लिंगायत बसव धार्मियांचा जागतीक उत्सव असल्यामुळे दर वर्षी विस्तार पावत आहे. कर्नाटक राज्याच्या विविध जिल्हयातूनच नव्हेतर इतर राज्यातून व देश-विदेशातून शरण व्रत धारकांचे आगमन होत असते. जानेवारी १३ च्या रात्रीपासून दि. १५ च्या रात्री पर्यंत सहभागी होणाऱ्या सर्वांच्या प्रसादाची (जेवणाची) व्यवस्था करण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post