व्यायाम शाळेच्या वार्षिक संमेलनाचे मा. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटनप्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील 360 फिटनेस व्यायाम शाळेचा  वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वर्षपूर्ती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. व्यायाम शाळेच्या वार्षिक संमेलनाचे उदघाटन  मा. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते  पार पडले. तसेच स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचे अभिनंदन केले.  360 फिटनेस व्यायाम शाळेचे सदस्य  रिशी पेणकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत पंजाब येथे खेळवल्या गेलेल्या मिस्टर इंडिया २०२२ चा खिताब पटकावून व्यायम शाळेचे आणि पनवेल रायगडचे नाव लौकीक केल्याबद्दल त्याचेदेखील अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी  मा. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या सह बांठीया स्कुलचे प्रभारी सचिन आंग्रे, मिस्टर इंडिया 2022 चे विजेते रिशी पेणकर, सहकारी शिवराज साखरे व जिममधील मेंबर्स उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post